माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे
असं दुसर्यानच येऊन का आपल्याला सांगाव?
आपणही कधीतरी स्वत: हून ते धाडस करावं.
एकदातरी निदान कुणावर तरी चुक्कुन का होइना; पण प्रेम करावं.
नावडत्या गोष्टींना आपलंस करावं
आवडतील नंतर म्हणून त्या स्वीकारावं
आवड-निवडीचं स्वातंत्र्य स्वेच्छेने गमवावं,
कधीतरी नक्कीच कुणावर तरी प्रेम करावं.
नातं ते नेमकं कोणतं, स्वत: च जाणावं
काय आहे ते विचारून कधीही ना दुखवावं
ही जाणीव येण्याइतपत तरी स्वत: झुकावं
कधीतरी नक्कीच कुणावर तरी प्रेम करावं.
अडीच अक्षरी प्रेमामधलं सामर्थ्य ते अनुभवावं
वात्सल्य अन त्यागाला सोबत घेऊन चालावं
‘मी’ पणाचं नकळत कधीतरी बलिदान द्यावं
कधीतरी नक्कीच कुणावर तरी प्रेम करावं.
दुसर्यासाठी जगण्यातला अर्थ काय असतो,
या प्रश्नाचं उत्तर स्वत: च शोधावं
प्रेमळ त्या आठवणींमध्ये एकदा तरी रमावं
कधीतरी नक्कीच कुणावर तरी प्रेम करावं.
२८/९/२००९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा