सोमवारचा दिवस तसा माझ्यासाठी अविस्मरणीयच म्हणायला हवा. एक तर पुण्यात घरच्यांनी घेतलेल्या घरामध्ये शिफ्ट होण्यामुळे, दिवसभर फ्लॅट साफ करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे , श्रमपरिहारासाठी खडकवासल्या धरणाच्या परिसरात घालवलेल्या रम्य संध्येमुळे, अन आयुष्यात पहिल्यांदाच फ्लॅटचे दरवाजे आतून बंद झाल्याने फ्लॅटच्या ग्यालरीत अडकून पडण्यामुळे, अन पहिल्यांदाच चोरट्यासारख आपल्याच घरातून शिडीच्या सहाय्याने खाली उतरल्यामुळे अन फ्लॅटचा कोणताही दरवाजा न तोडता परत चोरट्यासारखच खिडकीतून फ्लॅटमध्ये घुसल्यामुळे, अन हे सगळे पहिले-वहिले अनुभव आयुष्यात घ्यावे लागण्याचे कारण ठरलेल्या एका उंदरामुळे!
तर त्याच झालं असं की दिवसभराची मेहनत सत्कारणी लावण्यासाठी मी आणि भैया (आमच्या फैजपूरच्या जाधव काकांचा मुलगा. त्याच तसं नाव सूरज ) आणि मी दोघेही बाहेरच भरपेट जेवलो. सुस्तावलेल्या मूडमध्येच फ्लॅटवर परत आलो. भैयाचा फ्लॅट पहिल्या, तर आमचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर. सध्या सामान भैयाच्याच फ्लॅटमध्ये ठेवल्याने आम्ही दोघेही रात्री त्याच्याच फ्लॅटमध्ये आलो. घरात घुसलो, की तमाम फ्लॅटवासीयांच्या नेहेमीच्या सवयीप्रमाने दाराला लगेच आतून कडी लावली. नंतर दिवसभर राब राब राबून चकचकीत केलेला फ्लॅट न्याहाळला. सारं काही अलबेल असल्याचं बघत-बघतच मग कपडे बदलले. घरात दोघंच. त्यात फ्लॅटवर पंखाही नसल्यानी टिपीकल बॅचलर सारखं आपलं बर्मुडे चढवून बसलो. उकडत असल्यानी टी शर्ट घालण्याचा मोह वेळीच आवरला. गॅलरीचं स्ल्यायडींगचं दार उघडून आमच्या प्रॉपर्टीची मापं घेत निवांत हवा खात उभा राहिलो. रात्री जवळपास अकरा वाजल्याने आजूबाजूला सगळा अंधारच होता. मुंबई बेंगलोर हायवेच्या पलीकडच्या बाजूच्या काही इमारातींमधले बल्ब अन हायवेवरून जाणार्या गाड्यांचे बुईन्गचे आवाज...फ्लॅटवरचा पहिलाच दिवस असल्याने हे जरा बरं वाटत होतं. निवांत बघत बसलो होतो सगळं.
तेवढ्यात भैयांनी बाथरूममधून हाक मारली... दादा उंदीर! मी तिकडं जाईपर्यन्त उंदराने भैयाला एक प्रदक्षिणा घालून मधल्या कॉरिडॉराकडे धाव घेतली होती. समोरचं चित्र होतं - फ्लॅटची अगदी स्वच्छ धुतलेली चकाकणारी फरशी अन त्यावर उड्या मारणारा काळा कुळकुळीत उंदीर. क्रिकेटच्या स्टेडीअमवर साईड स्क्रीन अगदी व्यवस्थित अॅडजस्ट केल्यानंतर बॅट्समनला बॉलरनी टाकलेला बॉल जितका क्लीअर दिसत नसेल ना, तितका क्लिअर तो उंदीर मला त्या फरशीवर दिसत होता! एट ए ग्लान्स अन, विदाउट एनी स्पेशल कान्सनट्रेशन!. चेष्टा नाही, पण त्या उंदराच्या शेपटाचा टोकदार कोपराही त्या फरशीवर नीट दिसला. पहिला विचार आला तोच मुळी तो शेपटाचा कोपरा पकडून, उंदराला फ्लॅटच्या बाउन्ड्रीच्या बाहेर भिरकावण्याचा. पण तोपर्यंत उंदीरमामा थेट बेडरूमकडे धावले. पर्यायाने मी आणि भैयाही हातात झाडू घेऊन तिकडे गेलो. तोपर्यंत उंदीर पुन्हा मोकळ्या कॉरीडॉरमधून हॉलमध्ये आला. हॉल मोकळाच होता अन गॅलरी त्याला लागूनच, त्यामुळे दोघांनीही उंदाराला गॅलारीतून बाहेर सोडायचं असं ठरवला. त्या हिशेबानी सगळी नाकाबंदी केली. मग उंदीरमामाही आमच्या इच्छेनुसार गॅलरीत गेले. भैया गॅलरीत अन मी हॉलमध्येच होतो. उंदीर हॉलमध्ये परत येउ नये, म्हणून मी स्लायडीन्गचा दरवाजा ऑपरेट करत होतो. शेवटी उंदीर त्या गॅलरीच्या भिंतीवर चढला. मीपण गॅलरीत गेलो. स्लायडीन्गचा दरवाजा ओढून घेतला, अन उंदराला खाली टाकायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्या नादात इकडे स्लायडीन्गचा दरवाजा आतून लॉक झालेलं दोघांच्याही लक्षात आलं नाही. उंदीर खाली उतरायच्या ऐवजी गॅलरीच्या ग्रीलवर चढला. तो ग्रीलवरून पाळायला लागल्याच पाहून मला त्याचे फोटो काढायचा मोह झाला. कॅमेरा घ्यायला मागे फिरलो, अन तसाच थांबलो. गॅलारीच स्लायडीन्गचं दार आतून लॉक!
आत जाण्याचा प्रश्नच नाही. बर बाहेरून कोणी येउन दार उघडायचं, तर फ्लॅटचा मेन दरवाजाही आम्हीच आतून लावलेला. घरात आमच्या दोघान्व्यातीरिक्त तिसरंही कोणी नाही, की जो आतून दरवाजा उघडेल. भैयाला हे सांगितल्यावर उंदरासोबतचं आमचेही फोटो काढावेत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. उंदराचा विसर पडला नी गॅलरीतून खाली बघायला लागलो. खाली उंदीर मस्त उड्या मारत पळताना दिसला. कदाचित तो म्हणत असावा, आता या माझ्या मागे, बघतोच कसे येताय ते!

दोघीही एकमेकांकडे बघत होतो. मोबाईल आतच, कपडेही आतचं. शेवटी दोघांनाही हसायला आलं. तसच खाली बसलो. आता गॅलरीच्या दरवाज्याची काच तोडायची किंवा मेन दरवाज्याची कडी तोडायची असे दोनच पर्याय आमच्या लक्षात आले. काच फोडणं थोडं महागात जाणार हे लक्षात आल्यावर मेन दरवाजा पुढून जाउन तोडायचा असं ठरलं. कोणी दिसतयं का खाली म्हणून बघायला सुरुवात केली. समोरच्या बाजूला चाललेल्या बांधकामावरच्या एका काकांना हाक मारली. त्यांना सांगून आमच्या सोसायटीच्या रखावालादारांना सांगावा धाडला. रखवालदार आले की त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी शिडीची व्यवस्था केली. मग खाली उतरायचं तर निदान कपडेतरी हवेत म्हणून मग मी बर्मुड्यावर मी एक गॅलरीत वाळत घातलेला टी शर्ट चढवला. त्याच टी शर्टनी आम्ही दिवसभर फ्लॅट पुसून काढला होता. पर्यायाच नव्हता. नाहीतर नुसता बर्मुडा घातलेला कुणीतरी अनोळखी व्यक्ती एका फ्लॅटमधून खाली उतरतोय बघून सोसायटीवाल्यांनी पोलीस बोलवायलाही कमी केलं नसतं. त्यांच्यासाठी आम्ही पहिलाच दिवस असल्याने अनोळखीच ठरलो असतो ना.
शेवटी दोघेही गॅलरीतून शिडीवरून खाली आलो. एक काम झालं होतं, दुसरं करायचं होतं. ते म्हणजे दार तोडायचं. परत रखवालदाराला घेउन वर गेलो. आळी पाळीनं मी, भैय्या अन रखवालदारानी दार तोडायचा प्रयत्न करून बघितला, पण दार ढिम्म हलत नव्हतं. आमच्या प्रयत्नांनी ते एक सेंटीमीटरही हललं नाही. पुन्हा तिथंच बसलो. आतली कोणकोणती दारं उघडी आहेत हे बघायचा प्रयत्न केला. बाथरूमचं एक दार सोडलं तर बाकी सगळे बंद होते. त्या दारातून येणारा उजेडही दिसत होता. शेवटी तिसरा पर्याय सापडला. शिडी लावून बाथरूमच्या खिडकीतून आत जाण्याचा शेवटचा पर्याय. काचा व्यवस्थित निघाल्या तर कोणत्याही खर्चाविना पुन्हा घरात. थोडं बरं वाटलं. तिघंही खाली उतरलो. शिडी खिडकीशी लावली. ती थोडी कमकुवत होती. जास्त वजन पेलेल की नाही यात शंकाच होती. माझी प्रॉपर्टी भैयापेक्ष्या जास्तच आहे. या अनाठायी श्रीमंतीचे शिडीवर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेत, भैयाला म्हटलं आगे बढो. भैयाही मग मागे हाटला नाही. माझ्यापेक्षा वयानी साधारण १० वर्ष लहान असल्यानी त्याच्यात चांगलीच चपळता आहे. पठ्ठा सरसर-सरसर शिडीवरून वर गेला. उंच असल्यानी खिडकीच्या सगळ्या काचा त्याच्या हाताला व्यवस्थित आल्या. मी असतो तर एखादीच काच हाती लागली असती. त्यांनी हळूहळू सगळ्या काचा काढल्या. त्या जिन्यावर थांबलेल्या रखवालदाराकडे दिल्या. काचा काढून झाल्यावर खिडकीतून आत गेला. झालं. मोहीम फत्ते.
त्याने पुढून येउन दार उघडलं. शिडी जागेवर ठेउन रखवालदार न मी दोघेही घरात शिरलो. खिडकीच्या काढलेल्या काचा पुन्हा लावल्या. मस्त वाटलं. पुन्हा त्या गॅलरीच्या स्लायडीन्गच्या दरवाज्याकडे एक नजर टाकली. तो तसाच लागलेला होता. उठलो अन घरात पडलेली एक काठी उचलली. गावाकडे कसं खुंटी लावतात, तशी त्या दाराला ती काठी खुंटी म्हणून लावली. खुटी काढल्याशिवाय दार बंदच होणार नाही. रखवालदार गेला. मी अन भैया परत फ्लॅटमध्ये निवांत पडलो. पुन्हा उंदराच्या नादी लागायचं नाही हे ठरवलं. कोणी काहीही म्हटलं तरी फ्लॅटमध्ये एक मांजर पाळायचं ठरवलंय आता. निदान उंदराच्या नादानी अस परत फ्लॅटमध्ये अडकनं तरी होणार नाही ना. गरम होत होतं. त्यामुळं भैया झोपायला अंथरून घेउन गॅलरीत गेला. मी आत हॉलमध्ये गादीवर पडलो. पुन्हा मला तो टणाटण उड्या मारत खाली पळणारा उंदीर आठवला. पण या वेळी त्याच्या मागे मीही नाही गेलो अन माझ मनही नाही गेलं. मनातल्या मनात त्याला म्हटलं तू पळ थकेस्तोवर. मी थकलोय. मी झोपतोय. आता गोष्ट पुरे.

mast!
उत्तर द्याहटवाgost eka undarachicha 'part 2' kadhi lihinar?