फॉर्मली इन्फॉर्मल... वाचायला- म्हणायलाही थोडं वेगळं वाटतं ना. हा
विषय तसा खूप महिन्यांपासून, महिन्यांपासून नव्हे अगदी मागच्या वर्षभरापासून
डोक्यात घोळतोय. या वेळी नाही, तर पुढच्या वेळी लिहू म्हणून मागे पडला होता.
विषयाच्या बाबतीतही तशीच फॉर्मली इन्फॉर्मेलिटी जपत तो विषय सोडून देत होतो.
भुसावळच्या एका मित्राबरोबर गप्पा मारता मारता पुन्हा त्याच्यासोबतचं माझं फॉर्मली
इन्फॉर्मल वागणं- बोलणं लक्षात आलं. मग म्हटलं लिहायलाच हवं एकदा हे अधिकृतपणे.
फॉर्मेलिटी पाळणं हा तसा सभ्यतेचा एक भाग. ती पाळत नाही म्हणजे आपण
असभ्य, असं ठरत नसावं लगेचच, पण जाणवेल अशा पद्धतीने ते समोर मांडलं जातं एवढंच. काही
गोष्टी लिखित- अलिखित प्रकारात कुठेतरी बसतात. तशीच ही फॉर्मेलिटी. मला त्या
फॉर्मेलिटीच्या भानगडी उगाच कधी आवडल्याच नाहीत. वाटलं तर मनापासून करायचं, नाहीतर
नाहीच करायचं हे साधं तत्त्व पाळायचं. त्यामुळे आपसूकच इन्फॉर्मल वागणं- बोलणं
जोडीनेच आलं. हं, पण प्रत्येक ठिकाणी तसं वागता येईलच असं नाही. थोडक्यात जीभेला
जड वाटणारा सापेक्षता नावाचा एक जड शब्द इथं वापरावा लागतो.
आपलं एखाद्यासोबतचं फॉर्मल- इन्फॉर्मल वागणं हे व्यक्तिसापेक्ष असतंय. एखादी व्यक्ती आपल्या जितकी जवळ, तितकं आपलं त्यांच्यासोबतचं वागणं- बोलणं इन्फॉर्मल. फॉर्मेलिटीच्या बाबतीत याच्या अगदी उलट, हे माझं निरीक्षण आहे. प्रत्येकाला ही बाब लागू असेलच असं नाही. पण सर्वसामान्यपणे सर्व जण असंच वागतात असं एकंदरीत दिसतं. त्यामुळेच कदाचित एखादा नेहमीचा इन्फॉर्मल वागणारा आपल्याशी एकदम फॉर्मल टर्ममध्ये बोलायला लागला, की मी सावध होतो. दाल में कुछ काला है, हे जाणवतं. दोन घ्या- दोन द्या या ट्रॅकवरून गाडी घसरलेली दिसली की ही परिस्थिती जाणवते. अर्थात आपल्या अगदी जवळचे लोक जेव्हा फॉर्मेलिटी जपण्याचा प्रयत्न करतात, किंवा तसं दाखवू लागतात, तेव्हा ते आपल्यापासून दूर जाण्याचाही प्रयत्न करतात की काय अशी शंकाही येते मला. अर्थात हेही पुन्हा व्यक्तिसापेक्षचं.
पत्रकारितेचे धडे गिरवताना रानडेमध्ये वर्गात काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्या एकमेकांच्या नात्यांमध्येही एक राजकारण असतं. एकमेकांशी संवाद साधायची भाषा याच राजकारणावर अवलंबून असतं. एखाद्याला मान देणं, एखाद्यासमोर नमतं घेणं, एखाद्याला चार गोष्टी समजावून सांगणं- बोलणं हे सगळं या राजकारणावर अवलंबून असतं, अशा आशयाच्या होत्या त्या गोष्टी. अर्थात या शिक्षणाचा सारा संदर्भ संवाद आणि संवादशास्त्र हा होता. इथंही मी संवादशास्त्राच्या (दैनंदिन हं, रोजच्या जगण्यातलं, अजिबात थेरॉटिकल नाही. नो फॉर्मेलिटी अॅट ऑल) पातळीवरंच त्याचा विचार करतोय. राजकारणाच्या जागी फक्त मैत्री ही गोष्ट विचारात घेतलीये एवढंच. अर्थात मैत्रीमध्येही पुन्हा राजकारण आलंच. कारण एखाद्याला मी जवळचा मानत असलो, तरी त्याच्या लेखी मी त्याच्या जवळचा असेलंच असं नाही. कारण पुन्हा तिच गोष्ट व्यक्तिसापेक्षता.
तर निख्खळ मैत्री हा पॅरामीटर कॉन्सन्ट म्हणून गृहित धरला, तर ही मैत्री जेवढी घट्ट तेवढा आपला एकमेकांसोबतचा संवाद अधिकाधिक फॉर्मली इन्फॉर्मल होत जातो, हे माझं एक असंच केलेलं इक्वेशन आहे. जोपर्यंत मी सायन्सचा विद्यार्थी होतो, तोपर्यंत इक्वेशन्स, त्यासाठीची डेरिव्हेशन्स ही पाठ करून, रट्टा मारून लिहिण्यावर भर होता. सायन्समधून सोशल सायन्सेसकडे वळालो की जाणवलं ते किती फालतू होतं ते. आता आपली इक्वेशन्स आपणच मांडतोय, नी त्याची डेरिव्हेशन्सही आपणंच लिहितोय. वाटलं तर स्वीकारा, नाही तर व्यक्तिसापेक्षतेची चौकट विचारात घ्या. मी म्हणेन द्या सोडून. इतकं साधं आणि सरळ आहे हे. खरं तर व्यक्तिसापेक्षता काय नी सापेक्षता काय, अनुभवल्यानंतरच समजते.
विज्ञानाच्या नियमांमध्ये पहिल्यांदा जेव्हा कधी सापेक्षता हा शब्द ऐकला- वाचला होता, तेव्हा नक्कीच अंगावर काटा आला असणारे. त्यावेळी गतीचे नियम आणि त्याच्याशी जोडून आलेली सापेक्षता असलं काहीतरी आठवतंय मला. एका गाडीचा दुसऱ्या गाडीच्या सापेक्ष असणारा वेग अमूक ढमूक टमूक होता, तर दुसरी गाडी पहिलीच्या आधी किती वेळ पोहोचेल असली गणितं होती त्यावेळी. जड वळणाचा शब्द बघूनच मी आपलं तसली गणितं एकतर उशीराने सोडवायचो किंवा सोडूनच द्यायचो. विज्ञानाकडून समाजविज्ञानाकडे वळालोय, तर सापेक्षतेची गणितं आणखीचं अवघड होऊन बसलीत. जवळचा कोण नी लांबचा कोण, जवळच्याच्या लेखी जवळचा कोण नी जवळच्याच्या लेखी लांबचा कोण, माझा एखादा जवळचा त्याच्या एखाद्या जवळच्याविषयी काही वेगळा विचार करत असेल तर मग तो लांबचा कसा नी जवळचा कसा.... सतराशे साठ भानगडी. माणसं बदलली तरी सापेक्षता कायम. त्याच्यावर रामबाण उपाय म्हणून मी या इन्फॉर्मेलिटीचा विचार करतो. कोणाला काय विचार करायचाय तो करूदेत, मी मला वाटतंय ते करणार. सोप्पं आहे हे.
पत्रकारितेच्या व्यावसायिक जगातही हे फॉर्मली इन्फॉर्मल वागणं एक वेगळं औषध वाटतं. माणसं जोडायची, माणसांमध्ये मिसळून बोला-चालायचं म्हटलं की त्या फॉर्मल भिंती नको वाटतात. अर्थात ते समोरच्यावरही अवलंबून असतंच, पण आपण प्रयत्न केला तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्याला इन्फॉर्मल वागता- बोलता येतं येवढं नक्की अनुभवलंय मी. मोजकी लोकं अशी आहेत की त्यांच्यासोबत बोलताना या सगळ्या भिंती आपोआप बाजूला होतात. वय, हुद्दा अशा बाबींचा काहीएक फरक पडत नाही. त्यानंतर जे काही मिळतं, ते निश्चितच आनंददायी आणि समाधानकारक असंच असतं. मोजके मित्र असे आहेत की बोलायची सुरुवात शिव्यांनीच करणार. मोजकी लोकं अशी आहेत की जी नावाचा प्रेमळ अपभ्रंश करूनच हाक मारणार. हे त्यांचं आपल्यासोबतचं फॉर्मल वागणंच झालंय की. कोणतीही फॉर्मेलिटी न पाळणं हिच तिथे फॉर्मेलिटी बनते. हिच तर गम्मत आहे ना फॉर्मली इन्फॉर्मल वागण्यातली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा